#IPL2019 : चेन्नईचा विजयी चौकार; किंग्स इलेव्हन पंजाबवर 22 धावांनी मात

चेन्नई- चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबवर 22 धावांनी मात करत आयपीएलच्या बाराव्या सत्रात चौथा विजय नोंदविला. तीन वेळा विजेत्या ठरलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 3 बाद 160 धावा केल्या. त्यानंतर सरफराज खानच्या (67) निर्णायक खेळीनंतरही पंजाबला 20 षटकांत 5 बाद 138 धावांपर्यतच मजला मारता आली.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून धोनीने फलंदाजीचा निर्णय घेतला. डुप्लेसीच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 3 बाद 160 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सच्या नवीन सलामी जोडी शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून देत पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागिदारी केली. आठव्या षटकांत आर. अश्‍विनने शेन वॉटसनला सॅम कुरेनकडे झेल देवून बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर डु प्लेसिस, सुरेश रैना देखील अश्विनच्या फिरकीचे शिकार होऊन माघारी परतले.

डुप्लेसीने 38 चेंडूत 54 धावा केल्या. वॉटसनने 26 धावा केल्या. यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला 150 धावांचा पल्ला गाठून दिला. शेवटच्या टप्प्यात महेंद्रसिंग धोनी याने नाबाद 37 आणि अंबाति रायडूने नाबाद 21 धावांची खेळी केली. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने 23 धावा देत 3 गडी बाद केले.

161 धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या पंजाबला अवघ्या 7 धावांवर 2 झटके बसले. ख्रिस गेल व लोकेश राहुल समोर असतानाही चेन्नईचा कर्णधार धोनीने दुसरे षटक हरभजन सिंगला दिले. भज्जीने हा निर्णय सार्थ ठरवताना गेल व मयांक अग्रवालला बाद केले. भज्जीने पहिल्याच षटकात एकही धाव न देता दोन विकेट घेतल्या. त्यानंतर लोकेश राहुल व सरफराज खान यांनी सावध खेळ केला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि पंजाबला मजबूत स्थिती मिळवून दिली.

13 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुलला अपयश आले. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्यासाठी राहुल पुढे गेला, परंतु धोनीने चपळाईने चेंडूकडे धाव घेतली. त्याने नेहमीच्या शैलीत चेंडू मागे न वळताच चेंडू थेट यष्टिंवर मारला. पण, बेल्स न पडल्याने राहुल बाद ठरला नाही. नशीबाचे पारडे राहुलच्या बाजूने झुकले होते.

सरफराज आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. सरफराजने 43 चेंडूंत 51 धावा केल्या, तर राहुलने 42 चेंडूंत 51 धावा केल्या. पण, या दोघांना चेन्नईच्या गोलंदाजांनी मोठे फटके मारण्यापासून रोखले. त्यामुळे चेंडू व धावांचे अतंर वाढले. त्याच दडपणात राहुल बाद झाला. त्यानंतर सरफराजही 59 चेंडूंत 67 धावा करून माघारी परतला.

दरम्यान, मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीने संघात तीन बदल केले आहेत. त्याने संघात तीन बदल केले असून शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा यांना विश्रांती, तर दुखापतीमुळे ब्राव्हो खेळू शकला नाही. त्यांच्या जागी फाफ डुप्लेसी, हरभजन सिंग आणि स्कॉट कुग्गलेन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर किंग्स इलेव्हन पंजाबने संघात दोन बदल केले.

संक्षिप्त धावफलक :

चेन्नई सुपर किंग्स : 20 षटकांत 3 बाद 160 (शेन वॉटसन 26, डु प्लेसिस 54, सुरेश रैना 17, महेंद्रसिंग धोनी नाबाद 37, अंबाती रायडू नाबाद 21. आर. अश्‍विन 23-3). पंजाब किंग्स इलेव्हन ः 20 षटकांत 5 बाद 138 (के. राहुल 55, ख्रिस गेल 5, मयंक अग्रवाल 0, सरफराज खान 67, डेव्हिड मिलर 6. हरभजनसिंग 17-2, स्कॉट कुगलेजीन 37-2)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.