दुबई – सनरायझर्स हैदराबाद व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज आयपीएल स्पर्धेतील महत्त्वाचा सामना होत आहे. रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून चेन्नईचा तर राजस्थानकडून हैदराबादचा पराभव झाल्याने दोन्ही संघांसाठी ही लढत जिंकू किंवा मरू अशी बनली आहे.
हैदराबाद विरूध्द चेन्नई या महत्वपूर्ण सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूनं लागला आहे. चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनी याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#CSK wins the toss and they will bat first against #SRH.#SRHvCSK #Dream11IPL pic.twitter.com/btTuiqftUJ
— IndianPremierLeague (@IPL) October 13, 2020
स्पर्धेतील आव्हान जिंवत ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजयाची नितांत आवश्यकता आहे. स्पर्धेत चेन्नईने 7 सामन्यापैकी 2 सामन्यात विजय मिळविला आहे तर दुसरीकडे हैदराबादने 7 सामन्यापैकी 3 सामन्यात विजय संपादित केला आहे.