चेन्नई सुपर किंग्स पहिल्या लढतीची कमाई पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांना देणार

चेन्नई – आयपीएलची सुरुवात २३ मार्च ला होणार असून, चेन्नई सुपर किंग्स आपल्या पहिल्या लढतीची कमाई पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देणार आहे. चेन्नई सुपर किंग्सची पहिली लढत रॉयल चॅलेंजर्स बंगलूरू यांच्यासोबत होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चिदंबरम मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याची कमाई पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना दिली जाईल, अशी माहिती चेन्नई सुपर किंग्स संघाचे संचालक राकेश सिंह यांनी दिली आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीफचे ४० जवान शहीद झाले होते. आयपीएलच्या पहिल्या लढतीची कमाई जवानांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्स संघाने घेतला आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या हस्ते जवानांच्या कुटुंबियांना धनादेश दिला जाणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1108429307305750528

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)