चेन्नई – आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांना मंगळवारी (२३ मे) सुरुवात झाली. आज क्वालिफायर-१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला 173 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य दिले आहे. नाणेफेक हारल्यानंतर त्यांनी 20 षटकांत सात गडी गमावून 172 धावा केल्या.
ऋतुराज गायकवाडने संघाकडून सर्वाधिक 60 धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने 40 धावांचे योगदान दिले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने 16 चेंडूत 22 धावा केल्या. अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडूने 17-17 धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबे हे 1 धाव काढून बाद झाले. मोईन अली 9 धावांवर नाबाद राहिला.
गुजरातकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले. दर्शन नळकांडे, नूर अहमद आणि रशीद खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
Innings break!
Chennai Super Kings post 172/7 in the first innings 👊🏻
Will Gujarat Titans chase this down and make it to the Final?
Scorecard ▶️ https://t.co/LRYaj7cLY9#TATAIPL | #Qualifier1 | #GTvCSK pic.twitter.com/OyjQsymWCn
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत साखळीतील 14 पैकी 10 सामने जिंकत गुजरातने संपूर्ण वर्चस्व राखत 20 गुणांसह थाटात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. तर चेन्नईने 4 पैकी 8 सामने जिंकले तसेच एका सामन्यात निकाल न लागल्याने एक गुण मिळाला असे 17 गुण मिळवत प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले.
आता या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम सामना खेळणार असून पराभूत होणारा संघ क्लालिफायर 1 सामना खेळणार आहे. गुजरातचे पारडे जड राहणार असे दिसत असले तरीही धोनीच्या संघाने स्पर्धेचे चारवेळा विजेतेपद मिळवले आहे.