अहमदाबाद :- आयपीएलच्या 16व्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. सलामीवीर युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर 179 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break! @Ruutu1331 scores a magnificent 9⃣2⃣ as @ChennaiIPL post 178/7 on the board 👏 👏
2⃣ wickets each for @rashidkhan_19, @MdShami11 & Alzarri Joseph 👌 👌
The @gujarat_titans chase to begin soon 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/61QLtsnj3J#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/biRXWCdNZB
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत सर्वाधिक 92 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि चार षटकार मारले. त्याच्याशिवाय मोईन अलीने 23 धावांची खेळी केली. शिवम दुबे 18 चेंडूत 19 धावा करून बाद झाला.
धोनीने अखेरच्या षटकात एक चौकार आणि एक षटकार ठोकत संघाची धावसंख्या सात बाद 178 पर्यंत नेली. त्याने सात चेंडूत 14 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन बळी घेतले. तर जोशुआ लिटलला एक विकेट मिळाली.
#IPL2023 #GTvCSK : गुजरातचा गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघाची प्लेइंग-11
दरम्यान, चेन्नई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने दोन्ही सामने जिंकले आहेत.