चेन्नई :- अरविंद चिथंबरमने शेवटच्या दोन क्लासिकल फेऱ्यांमध्ये चमकदार कामगिरी करताना चेन्नई ग्रँड मास्टर्सचे विजेतेपद पटकावले. तर दुसरीकडे त्याबरोबरीने ग्रँडमास्टर व्ही. प्रणवनं संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत चॅलेंजर प्रकारातील विजेतेपद आपल्या नावावर केलं.
मास्टर्स प्रकारातील अव्वल स्थानासाठी त्रिकोणी लढत झाली. यामध्ये जीएम. अरविंद चिथंबरम, ग्रँडमास्टर लेव्हॉन अरोनियन यांच्यातील पहिल्या ब्लिट्झ प्लेऑफमध्ये अरविंदने लेव्हॉनचा पराभवाचा केला. यानंतर त्याने काळ्या मोहरांसह दुसरा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले.
A flawless finish! 🏆 Aravindh Chithambaram wins the Masters category at Chennai Grand Masters 2024. Well played, champion! ♟️
.
.
.
.#Chennaigrandmasters #SDAT #SportsTN @CMOTamilnadu @Udhaystalin @TNDIPRNEWS @ChessbaseIndia @mgd1_esports @Chennai_GM pic.twitter.com/2E8cqkzxv7— Sports Tamil Nadu (@SportsTN_) November 11, 2024
अरविंदने परहम एम विरुद्धचा पुढील सामना जिंकला, तर अव्वल क्रमवारीत असलेले ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी आणि लेव्हॉन अरोनियन यांनी आपापल्या लढती बरोबरीत सोडविल्या. अरोनियनने ग्रँडमास्टर अमीन तबताबाईसोबततर अर्जुनने ग्रँडमास्टर मॅक्सी वॅचियर लॅग्रेव्हसोबतची लढत बरोबरीत राहिली.
टायब्रेकरमध्ये चांगले गुण मिळविताना अरविंदने अव्वल स्थान मिळविले. अरोनियन आणि अर्जुन यांनी देखील दोन गेम ब्लिट्झ प्लेऑफ खेळताना सडन डेथमध्ये विजय साकारला. त्यानंतर अरोनियनने अर्जुनला बरोबरीत रोखून अरविंदविरुद्धच्या लढतीतील स्थान निश्चित केले. अरविंदने पहिला सामना जिंकून दुसऱ्या सामन्यात बरोबरी साधत विजेतेपद पटकावले. चॅलेंजर प्रकारात प्रणवला ग्रँडमास्टर ल्यूक मेंडोन्काविरुद्ध फक्त ड्रॉची गरज होती आणि त्यानं अपेक्षित कागगिरी करत विजेतेपदावर नाव कोरलं.