धुळ्यात केमीकल फॅक्‍टरीत भीषण स्फोट

स्फोटात 7 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

धुळे : शिरपुरमधील वाघाडी येथे असणाऱ्या एका केमिकल फॅक्‍टरीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापार्यंत सात जणांना मृत्यू झाला आहे. तर स्फोटामुळे फॅक्‍टरीत आगीने रौद्र रूप धारण केले आहे. दरम्यान, या स्फोटात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वाघाडीमध्ये असणाऱ्या एका केमिकल फॅक्‍टरीत शनिवारी सकाळी स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. स्फोटाची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की त्या आवाजाने फॅक्‍टरीच्या आजुबाजुच्या काही घरांची पडझड झाल्याचे सांगण्यात येत आहे. फॅक्‍टरीत भीषण आग लागली असून आतमध्ये काही कामगार अडकले असल्याचे सांगण्यात येत असून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यानश जखमींना जवळच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.