कुरकुंभ औद्योगिक परिसरात केमिकल बॉम्ब

कंपन्यांचे अंतर्गत, बाह्य सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष

– विनोद गायकवाड

कुरकुंभ – येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांत रसायनांशी संबंधित उत्पादने तयार केली जात असल्याने या वसाहतीला “केमिकल बॉम्ब’ असेही म्हंटले जाते. अशा या “बॉम्ब’च्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर तेथील सुरक्षा यंत्रणेचाही प्रश्‍न चव्हाट्यावर येत आहे. कंपनीची अंतर्गत तसेच बाहेरील सुरक्षा ज्यांच्या हाती आहे, अशा सुरक्षा रक्षकांकडेच दुर्लक्ष होत असल्याची बाब उघड झाली असून राज्य शासन सुरक्षा रक्षक मंडळाचे नियम मोडीत काढून खासगी सुरक्षा एजन्सींच्या माध्यमातून अशा सुरक्षा रक्षकांची पिळवणूक कंपन्यांकडून होत आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्काईल कंपनीतील आगीच्या घटनेनंतर येथील कंपन्यांतील अपघातांसह प्रदूषणाचा प्रश्‍न समोर आला आहे. येथील सर्वच कंपन्या रसयान उत्पादनांशी संलग्न असल्याने कंपन्यांची सुरक्षा यंत्रणा महत्त्वाची आहे. परंतु, अनेक कंपन्यांमध्ये स्वत:ची सुरक्षा यंत्रणाच नसल्याचे तसेच खासगी एजन्सींकडून अशी यंत्रणा राबविली जात असल्याची बाब समोर येत आहे. त्यातही खासगी एजन्सींकडून होणारी पिळवणूक, अपुरे वेतन व सुरक्षा रक्षकाची होणारी अवहेलना यातून कामात होणारी चालढकल अशी कारणेही अपघातास कुरकुंभ औद्योगिक वसाहत परिसरात वाढलेले गुन्हेगारीचे तसेच चोऱ्यांची प्रमाण लक्षात घेता, चोरट्यांकडून कंपन्यांतील साहित्य चोरीकरीता कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न हजारो कामगारांच्या जीवाशी खेळणारा आहे. यामुळेच कंपनीच्या अंतर्गत सुरक्षे बरोबरच बाहेरी सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची ठरू लागली आहे. याकरीता सुरक्षा यंत्रणा उभारण्याकडे संबंधीत कंपन्यांचा कल असला तरी खासगी एजन्सींचा आधार घेतला जात आहे. याच करणातून अशा सुरक्षा एजन्सींची “दुकाने’ही वाढली आहेत. परंतु, कंपन्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या खासगी एजन्सींकडून सुरक्षारक्षकांची पिळवणूक होत असल्याने सुरक्षेच्या कामात ढिलाई होत असल्यानेही काही किरकोळ अपघाताच्या, चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.

कुरकुंभ सारख्या बड्या औद्योगिक वसाहतीकरीता सुरक्षारक्षक सेवा प्रदान करणाऱ्या शेकडो खासगी संस्था (एजन्सी) आहेत. सुरक्षारक्षक मंडळांचा कुठलाही नियम न पाळता, बेकायदेशीरपणे अशा खासगी एजन्सी चालविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक एजन्सीमध्ये सुरक्षारक्षकांना पुरेसे वेतन दिले जात नाही. सुरक्षा रक्षक मंडळाने कायद्यानुसार ठरविलेल्या किमान सुविधाही त्यांना देण्यात येत नाहीत. सुरक्षारक्षक सांभाळत असलेली जबाबदारी व जोखीम यांच्या तुलनेत मिळणारे वेतन अत्यल्प आहे, अशी असंख्य सुरक्षा रक्षकांची तक्रार आहे. काही कंपन्यांना सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करणे अनावश्‍यक वाटते. मात्र, सुरक्षारक्षक कुठल्याही प्रकारच्या संकटसमयी तत्पर असतात. कंपनीची विश्‍वासाने देखभाल करतात. परंतु, यातही सक्षम व प्रशिक्षित सुरक्षारक्षकांची संख्या रोडावत चालली आहे.

कंपन्यांनी घ्यावी काळजी…
कंपन्यांनी खासगी संस्थेला सुरक्षेचे काम देताना शासन नियमानुसार सुरक्षारक्षक एजन्सीला मान्यता आहे किंवा नाही, खासगी सुरक्षारक्षक नियंत्रण अधिनियम 1981 अंतर्गत सदर संस्था सवलत प्राप्त आहे का? “सक्षम कामगार’ अधिकरणाकडे अशा संस्थेची नोंद झाली आहे की नाही. त्यांच्याकडे भविष्यनिर्वाह निधी क्रमांक, सेवा कर नोंदणी क्रमांक, दुकाने आस्थापना नोंदणी याची पूर्तता केली आहे का? या बाबींकडे कटाक्षाने लक्ष देणेही गरजेचे आहे.

कंपन्यांची अंतर्गत तसेच बाह्य सुरक्षा महत्त्वाचीच आहे. याकरिताची यंत्रणाही सक्षम असायला हवी. याबाबत महामंडळाचे नियम आहेत, त्याची अंमलबजावणी कंपन्यांनी करणे गरजेचे आहे. नियम कोणी मोडीत काढीत असेल तर त्यांना तशा सूचना देण्यात येतील.
-मिलिंद पाटील, उपअभियंता कुरकुंभ औद्योगिक वसाहत

कुरकुंभ औद्योगिक परिसरात केमिकल बॉम्ब
कारणीभूत ठरू शकतात. यामुळे कंपन्यांची सुरक्षा यंत्रणा भक्कम असावी, असाही मुद्दा चर्चीला जात आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीसह परिसरातील छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या शोषणाचाही प्रश्‍न विविध कारणांमुळे समोर येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)