एफ ए करंडकाच्या अंतिम फेरीत अर्सेनलशी लढत
लंडन –चेल्सीने फुटबॉल असोसिएशन चॅलेंज करंडक (एफए कप) फुटबॉल स्पर्धेत मॅंचेस्टर युनायटेडचा 3-1 असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर चेल्सीने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला असून आता विजेतेपदासाठी त्यांची लढत बलाढ्य अर्सेनलशी होणार आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात चेल्सीने मॅंचेस्टर युनायटेडचा सहज पराभव केला. या सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडच्या खेळाडूंनी टाळता येत असलेल्या अनेक चुका केल्या. ऑलिव्ह गिरॉडने पहिल्या हाफमधील जादा वेळेत गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मासोन माउंट व हॅरी मुगइर यांनीही गोल करत संघाला दुसरा हाफ संपण्यापूर्वी मोठी आघाडी मिळवून दिली. त्यावेळी मॅंचेस्टर युनायटेडला पराभव स्पष्ट दिसत होता.
मात्र, दुसरा हाफ संपण्यापूर्वी त्यांच्या ब्रुनो फर्नांडिसने गोल करत ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अर्थातच चेल्सीने आपला बचाव आणखी भक्कम करत नंतर त्यांना गोल करण्याची एकही संधी दिली नाही व दिमाखात अंतिम फेरी गाठली. या फेरीत आता त्यांची लढत अर्सेनलशी होणार आहे. अर्सेनलने उपांत्य फेरीत मॅंचेस्टर सीटीचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे.