नवी दिल्ली – करोनाला रोखण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे महत्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. मात्र, सध्या लसीचा तुटवडा असल्याने अऩेक भागात लस उपलब्ध होत नाहिए.
त्यामुळे नागरिकांना आपल्या भागात लस उपलब्ध आहे की नाही याची माहिती व्हाॅट्सअपवर मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून एक व्हाॅट्सअॅप नंबर जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार तुम्हाला तुमच्या भागातील लसीच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळणार आहे.
अशी घ्या माहिती –
केंद्रीय आरोग्य विभागाकडून 9013151515 हा नंबर जाहीर करण्यात आला आहे. यावरून तुम्हाला घरबसल्या तुमच्या जवळील लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध आहे की नाही याची माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला एक मेसेज करायचा आहे.
वरील व्हाॅट्सअप नंबरवर तुमचा पिनकोड टाका आणि सेंड करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या भागातील लसीबद्दल अधिक माहिती मिळेल. लसीच्या नोंदणीनंतर लसीकरणासाठी तुमचा नंबर आल्यास त्याचे अपडेटदेखील या नंबरवर मिळू शकते. गर्दी आणि गोंधळाशिवाय लसीकरण होण्यासाठी ही व्यवस्था तयार केल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.