लॉटरी लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक

नगर – लॉट्री लागल्याची बतावणी करून, अज्ञात व्यक्तीने महिलेला व तीच्या नातवाला दुचाकीवर बसवून, एका ठिकाणी घेऊन जावून अंगावरील सर्व 34 हजारांचे दागिने काढून घेतल्याची घटना केडगाव येथील मोहिनीनगर परीसरात घडली. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालन किसन सामसे (वय- 60) या केडगावमधील मोहिनीनगर भागातील जगदंबा प्राथमिक शाळेच्या मागे राहतात. बुधवारी (दि.13) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे आला. तुम्हाला लॉट्री लागली आहे, माझ्या सोबत चला अशी बतावणी केली. सामसे या आपल्या नातवाला सोबत घेऊन त्या इसमाबरोबर दुचाकीवर बसून गेल्या. त्याने सोनार हॉस्पिटल समोर दुचाकी उभा करून सामसे यांच्या अंगावरील दागिने चोरले.

Leave A Reply

Your email address will not be published.