सलमानच्या नावे फसवणूक

सलमान खान सध्या आगामी “भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. मात्र याच दरम्यान सलमानने आपल्या सोशल मिडीया अकाउंटवरून एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्याने आपल्या नावे कोणाचीही फसवणूक होऊ नये, यासाठी आपल्या फॅन्सला एक सावधानतेचा इशारा दिला आहे. सोशल मिडीयावर एका इव्हेंटचे पोस्टर व्हायरल होते आहे. या इव्हेन्टचे आयोजन “बीईंग ह्युमन फौंडेशन’ने केले आहे आणि स्वतः सलमान खान या इव्हेंटचा होस्ट असणार आहे.

एवढेच नाही तर गुरु रंधवा, नेहा कक्कड, अरमान मलिक यासारखे सेलिब्रिटीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, असे या पोस्टरमध्ये म्हटले आहे. मात्र सलमानने आपण या इव्हेंटशी संबंधित नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. एवढेच नव्हे, तर “बीईंग ह्युमन फौंडेशन’चीही या कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही, असे सांगून त्याने या इव्हेंटचा भांडाफोड करून टाकला आहे. या कार्यक्रमासाठी आपले नाव वापरून आपल्या फॅन्सची फसवणूक होऊ नये, या हेतूने सलमानने सर्वांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आता या म्युझिकल इवेंटची माहिती प्रकाशात येईल. पण तोपर्यंत सलमानच्यावतीने हा सावधानतेचा इशारा त्याच्या फॅन्सनी लक्षात ठेवलेला बरा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.