-->

खेळण्यातल्या नोटांमुळे फसगत

भवानीनगर – ग्रामीण आणि शहरी भागात खेळण्यातल्या नोटांचा वापर बेमालूमपणे व्यवहारात केला जात असल्याने अशा डुप्लिकेट नोटांमुळे व्यापाऱ्यांची फसगत होत आहे. शासनाने खेळण्यातल्या नोटांवर तातडीने बंदी आणावी, अशी मागणी ग्रामीण भागातील व्यापारी, विक्रेते, व्यावसायिकांकडून होऊ लागली आहे.

बारामती आणि इंदापूर तालुक्‍यात अशा प्रकारची फसवणुकीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागात फळविक्रेते आणि भाजी मंडईमध्ये खेळातील नोटांचा वापर करून विक्रेत्यांची फसवणूक केली जात आहे. ग्रामीण भागात फिरून विक्री करणारे तसेच बाजारात बसणारे बहुतांशी विक्रेते हे वयस्कर असल्याने तसेच ते अशिक्षित असल्याने याचा गैरफायदा घेत खेळण्यातील नोटा अशा विक्रेत्यांना दिल्या जात आहेत. ओरिजनल की डुप्लिकेट नोट यातील फरक चटकन लक्षात येत नसल्याने विक्रेत्यांची फसगत होत आहे.

खेळण्यातील विशेषत: दोनशे रुपयांच्या डुप्लिकेट नोटेवर भारतीय बच्चोंका बॅंक अशा प्रकारे छापलेले आहे. परंतु, या छापलेल्या मजकुराकडे आवर्जून कोणीही लक्ष देत नसल्याने विक्रेते सहजपणे फसत आहेत. ग्रामीण भागात भाजीविक्रेते आणि फळविक्रेते यांना दिवसभर विक्री करून दिवसाकाठी तीनशे ते चारशे रुपये नफा मिळत असल्याने एखाद्या व्यापाऱ्याला आशा डुप्लिकेट नोटामुळे पाचशे ते हजार रुपयाला गंडा घातला जात असेल तर या व्यापाऱ्यांचे दोन दिवसाचे उत्पन्न बुडू शकते. त्यामुळे अशा खेळण्यातील नोटांवर तातडीने बंदी आणावी, अशी मागणी
होत आहे.

रिझर्व्ह बॅंक परवानगी देतेच कशी?
केंद्र सरकार नवीन नोटा तयार करीत केलेल्या असताना अशा नविन नोटीही लहानमुलांच्या खेळात वापरल्या जात आहे. विशेष म्हणजे त्या हुबेहुब दिसत असून रिझर्व्ह बॅंक अशा नोटा छापण्यास परवानगी कशी देते? याबाबत महसूल, पोलीस प्रशासन सतर्क नाही का? असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.