मोठ्या पडद्यावर झळकणार सिद्धांत चतुर्वेदी

बॉलीवूडमध्ये यंदाच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपटांपैकी जोया अख्तर यांचा “गली बॉय’ हा एक चित्रपट आहे. मुराद आणि सफीनाच्या भूमिकेत रणवीर आणि आलिया यांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. तर जोया अख्तरने चित्रपटातील प्रत्येक भूमिका दमदारपणे मांडली. या चित्रपटातील छोटया कलाकारांनीही त्यांची भूमिका प्राणपणाने साकारली. विशेष करून एम सी शेरच्या भूमिकेतील सिद्धांत चतुर्वेदीला प्रेक्षकांनी खूपच पसंती दर्शविली.

“गली बॉय’मध्ये सिद्धांतची निर्णायक भूमिका होती. तसेच त्याने आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची वेगळी छाप उमटविली. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची सर्वांनी स्तुती केली. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्याला पत्र लिहून खास शुभेच्छा दिल्या. सिद्धांतने पहिल्या चित्रपटात आपला वेगळा फॅनबेस तयार केला असून त्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे.

आता चित्रपट निर्माता एम. सी. शेरावर एक विशेष चित्रपट साकारण्याच्या विचारात आहे. जोया अख्तर आणि रितेश सिधवानी हे हा चित्रपट निर्मिती करणार असून हा चित्रपट फक्‍त एमसी शेर याच्यावर आधारित असणार आहे. या चित्रपटात शेराचा जीवनप्रवास दाखविण्यात येणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा हिप हॉप कल्चर दाखविण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.