सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. नौदल दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023ला मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचे लोकार्पण केले होते.
विरोधकांनी केली टीका
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात, आणि तो पुतळा बसवण्यात जो काही हलगर्जी पणा झाला असेल, या सगळ्या कामात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी करण्यासााठी राज्य सरकारने समिती नेमली पाहीजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. अनथ्या आम्ही तीव्र आंदोलन करु असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.
तसेच ही अत्यंत दुर्देवी घटना आहे, तिथले पालकमंत्री सर्व प्रकरणाची चौकशी करतील, पण त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पुतळा लवकर उभा करणं हे आमचं पहिलं कर्तव्य असेल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत.