पिंपरी – चिंचवडगाव येथील संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ (चिंचवडचा राजा) यांनी यंदाच्या वर्षी आकर्षक मखर साकारले आहे. तसेच चांदीच्या आभूषणाने नटलेली गणरायाची मूर्तीही मनमोहक आहे.
चिंचवडच्या राजाचे यंदा 57 वे वर्ष आहे. विघ्नहर्ता न्यासतर्फे आयोजित केलेल्या आदर्श विसर्जन मिरवणुकीत मंडळास द्वितीय क्रमाकांचे बक्षीस मिळाले आहे. मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. याशिवाय रक्तदान शिबीर, मोफत वाचनालय असे उपक्रम राबविण्यात येत आहे.
चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच मंडळांकडून वृद्धाश्रम व पूरग्रस्तांनाही मदत करण्यात आली आहे. महेश मिरजकर, विठ्ठल सायकर, प्रमोद बरडिया, सिध्देश शेलार, आदित्य मिरजकर, शुभम ढवळे, अजिंक्य राऊत, श्रीशैल्य होणराव, दुर्गेश मिरजकर, प्रथमेश मिरजकर आदी कार्यकर्त्यांनी गणेश उत्सवाचे आयोजन केले आहे.