मुंबई – सुमारे 1 हजार 900 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी “आयसीआयसीआय’ बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर तसेच व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक माजी खासदार वेणुगोपाळ धूत यांच्या विरोधात ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आरोपपत्र दाखल केले आहे.
कोचर यांनी पदाचा गैरवापर करत, दीपक कोचर संचालक असलेल्या नू पॉवर कंपनीला 1 हजार 875 कोटी रुपये कर्ज दिले. ते कर्ज बुडीत खात्यात गेले. फक्त कागदावर असलेली न्यू पॉवर ही कंपनी व्हिडीओकॉन कंपनीची उपकंपनी असल्याचे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे.
दीपक कोचर यांनी काळा पैसा वैध करण्यासाठी कर्जाऊ रकमेचा वापर केल्याचा संशय असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.