बेंगळूरु – ‘आयएमए’ बनावट योजनांप्रकरणी सीबीआयने आज बेंगळूरु शहराच्या माजी सहायक आयुक्त एल. सी. नागराज आणि माजी ग्रामीण लेखापाल मंजुनाथ यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. या फसव्या योजनेत हजरो ठेवीदारांची आर्थिक नुकसान झाले होते.
‘आयएमए’प्रकरणी नागरज आणि मंजुनाथ यांच्याविरोधात गेल्या आठवड्यात बेंगळूरु येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा खटला दोन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी एक लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी संबंधित आहे, असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले.
‘आयएमए’चे संचालक मोहम्मद मन्सूर खान याला क्लीन चीट देण्यासाठी नागराज यांनी 4.5 कोटी रुपयांची आणि लेखापाल मंजुनाथ याने 10 लाख रुपयांची लाच घेतली होती.
या प्रकरणातील अन्य आरोपी तत्कालीन उपायुक्त बी. एम. विजय शंकर यांनी 24 जून रोजी रात्री निवासस्थानी आत्महत्या केली होती.
शंकर, नागराज आणि मंजुनाथ यांनी ‘आयएमए’ संचालकांना क्लीन चीट मिळवून देण्यासाठी सरकारला खोटा अहवाल दिला होता. फसव्या योजनेविरोधातील गंभीर तक्रारींबाबत रिझर्व बॅंकेने चिंता व्यक्त केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून हा खोटा अहवाल सादर केला असा आरोप आहे.