नवी दिल्ली – इस्लामिक स्टेट खोरसान प्रोव्हिन्स अर्थात ‘आयएसकेपी’ या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असल्यावरून राष्ट्रीय तपास संस्थेने आज पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.
आरोपपत्र दाखल केलेल्यांमध्ये दिल्लीचा जहानझीब सामी, मूळची काश्मीरची हिना बशीर, हैदराबादचा रहिवासी अब्दुल्ला बासिथ आणि पुण्याच्या रहिवासी असलेल्या सादिया अन्वर शेख आणि नबील सिद्दिक खत्री यांचा समावेश आहे. दिल्लीतील न्यायालयात त्यांच्यावरील आरोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकारविरोधात असंतोष निर्माण करणे, समाजामध्ये धार्मिक असहिष्णुता निर्माण करणे आणि घातपाती कारवाया करण्यासाठी ‘इसिस’ आणि ‘आयएसकेपी’या दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवल्यबद्दल या सर्वांवर आरोप ठेवण्यात आला आहे.
भारतीय दंड संहिआ आणि बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली या सर्वांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.