वकीलांचा महाभियोग बचावात दावा
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर अधिकाराच्या गैरव्यवहाराचे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरीत आहेत, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकीलांनी सुरू असलेल्या महाभियोग सुनावणीत सांगितले.
या माहाभियोगाचे कलम कोणत्याही घटनात्मक दर्जापेक्षा खूप कमी दर्जाचे आहे. असे ट्रम्प यांचे वकील पॅट किपोलोन यांनी सांगितले. ते म्हणाले, कोणत्याही कारणाविना आणि घटनात्मक तरतुदीचे उल्लंघन करून एका यशस्वी राष्ट्राध्यक्षाला निवडणुकीच्या रिंगणाबाहेर काढण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे.
सत्तेचा गैरवापर केल्याचा राष्ट्राध्यक्षांवरील आरोप फेटाळून लावण्याचे आवाहन करत ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत झालेला पराभवामुळे हे आरोप केले जात असून अगामी निवडणुकीत होणारा हस्तक्षेप हा धोकादायक असून तो अमेरिकन नागरिकांची हानी करणारा आहे. त्यामुळे सीनेटच्या सदस्यांनी ते करू देऊ नये. हे येथेच आणि आत्ताच थांबवण्याची वेळ आली आहे.
युक्रेनशी व्यवहार करताना ट्रम्प यांनी सत्तेचा गैरवापर केला आणि संसदेचा अपमान केला, असे त्यांच्यावर आरोप आहेत.