अतिरिक्त एटीएम व्यवहारावर आणखी शुल्कवाढ

मुंबई – मोफत एटीएम व्यवहाराच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारावरील शुल्क वाढविण्यास रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिली आहे. आतापर्यंत प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 20 रुपये शुल्क आकारण्यात येत होते.

एक जानेवारी 2022 पासून हे शुल्क 21 रुपये करण्यात आले आहे. ही शुल्कवाढ रोकड आणि बिगर रोखीच्या व्यवहारांना लागू असेल. मात्र ग्राहकांना स्वतःच्या बॅंकेच्या एटीएमवर पहिले पाच व्यवहार मोफत असतील.

मोठ्या शहरात इतर बॅंकेच्या एटीएमवर तीन व्यवहार तर छोट्या शहरात पाच व्यवहार मोफत असतील. बॅंकांचा एटीएमवरील खर्च वाढल्यामुळे एका तज्ञ समितीच्या अहवालानंतर शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.