खेडशिवापुर: खेडशिवापुर टोलनाक्यावर एका खाजगी बस मधून 32 लाख रुपयांचे अमली पदार्थ( चरस )जप्त करण्यात आले.
राजगड पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती वरून एका खाजगी बस मधून चरस नेली जात असल्याचे खबर मिळाल्या वर पोलिसांनी सापळा लावून मुंबई वरून गोव्याला चाललेल्या खाजगी बसला पहाटे पाच च्या सुमारास खेडशिवापुर टोल नाक्यावर थांबवून तपासणी केली असता बस मधील एका इसमा कडे चरस असलेले पुडे आढळून आले.
तपास पथकाने त्या इसमास ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला जप्त केलेल्या चरस चे एकूण वजन 6 किलो असून त्याचे भारतीय बाजारातील मूल्य हे अंदाजे 32 लाख रुपये असून आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे साडेतीन कोटी रुपये एवढी आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख ,बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , भोर पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम,पोलीस हवालदार सोमनाथ जाधव, संतोष तोडकर ,अजित माने ,भगीरथ घुले ,नाना मदने प्रमिला निकम यां पथकाने केली.
आरोपीने उलटी येत आहे कारण सांगून बस च्या बाहेर येऊन पळण्यास सुरवात केली या वेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील व सहाय्यक निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी पाठलाग करून त्याला पकडले.