BREAKING : काँग्रेसकडून पंजाबमध्ये शिख नेत्यालाच संधी; चरणजीत सिंग चन्नी नवे ‘कॅप्टन’

नवी दिल्ली – पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची वर्णी लागली. आधी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यातीत 62 वर्षांचे सुखजिंदर सिंह रंधावा यांचे नाव आघाडीवर होते. मात्र या राजकीय नाट्याला नवे वळण मिळालं असून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील रंधावा यांचं नाव कट झालं.

दोन दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाची रस्सीखेच अखेर आज थांबली आहे. चरणजीत सिंह चन्नी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. एकंदरीतच काँग्रेसने पंजाबमध्ये पुन्हा एकदा शिख चेहऱ्यालाच संधी दिली आहे.

अनेक नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होती. पण, अखेर आज काँग्रेसच्या हायकमांडने सर्व आमदारांची सहमती घेऊन चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.