चांद्रयान-2 ची वैशिष्ट्ये

नवी दिल्ली – अंतराळात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने केलेल्या नियोजनानुसार चांद्रयान 2 चं आज प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवण अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीपणे झेपावलं.

चांद्रयान-2 ची वैशिष्ट्ये

1) चांद्रयान-2चे वजन 3 हजार 850 किलो इतके आहे. हे वजन आठ हत्तींच्या वजनाइतके आहे.
2) यात 13 भारतीय पेलोड आहेत. त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लॅंडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय नासाचे एक पॅसिव्ह एक्‍सपेरिमेंट देखील आहे.
3) चांद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहिम झालेली नाही.
4) भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान-2 एक उदाहरण ठरणार आहे.
5) या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही.
6) चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)