फेसबुकवर राजकीय नेत्यांचे चारित्र्यहनन; सायबर सेलकडे तक्रार

पुणे, दि.18 विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांचे सायबर सेल ऍक्‍टिव्ह झाले आहेत. याबरोबरच पक्षांचे कार्यकर्तेही ऑन लाईन ऍक्‍टीव्ह आहेत. त्यांच्याकडून एकमेकांचे चारित्र्यहनन करण्याची एकही संधी सोडली जात नाही. यासाठी फेसबुक, व्हॉटसअप आदी सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे. ही टीका अनेकदा खालच्या पातळीवर केली जात आहे.

यामध्ये नेत्यांची छायाचित्र एडीट करुन विविध पोस्ट टाकल्या जात आहेत. या प्रकारेच “राजकारण महाराष्ट्राचे” या ग्रुपवर पोस्ट टाकून काही राजकीय नेत्यांची बदनामी करण्यात आली. याप्रकरणी सामाजीक कार्यकर्ते सचिन शिंगवी यांनी सायबर क्राईम सेलकडे तक्रार केली आहे.

शिंगवी यांनी केलेल्या तक्रारीत राजकारण महाराष्ट्राचे या पेजवर त्यांना जॉईंन होण्यासंदर्भात रिक्वेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारली असता, धनाजी वाकडे या फेक नावाने खाते असलेल्या व्यक्तीने शरद पवार, सोनीया गांधी आणी राज ठाकरे यांची छायाचित्रे एडिट करुन बदनामिकारक पोस्ट टाकल्या. या पोस्टमुळे भावना दुखावल्या असल्याने तक्रार केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला सर्वसामान्यातून नेत घडण्यासाठी 10 ते 15 वर्षाचा कार्यकाळ लागतो. याप्रकारे जनतेतून आलेल्या नेत्यांचे चारित्र्यहनन सॉफ्टवेअरचा वापर करुन काही मिनीटांत केले जाते. व्हॉटसअप आणी फेसबुकच्या माध्यमातून अशा प्रकारे चारित्र्यहनन आणी बदनामिचे प्रकार वाढले आहेत.

Ads

1 COMMENT

  1. ज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृह मंत्री अमित शहा सारखे नेते देशा चे खोटे नाटे इतिहास स्वतःच्या राजकीय फ़ायद्या साठी बरळत असतात, त्यांच्या कोणत्याही विधानाला विचारसरणीला कोणते ही तारतम्य नसते, निव्वळ विरोधी पक्षावर चिखल फेंक करून स्वताची प्रतिमा उचविन्याचे चे काम है करू शकतात तर त्यांच्या अंध- बहिरे- गोबर भक्ता कडून चांगली अपेक्षा करने अत्यंत दुर्देवी बाब आहे।
    मुळात भाजप पक्षाचा पाया हा चिखलात रुतलेला आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)