मुंबई – अॅसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी फर्स्ट लूक आणि ट्रेलर प्रदर्शित केला होता. या चित्रपटाच्या मध्यवर्ती भूमिकेत दीपिका पदुकोण झळकणार आहे. या फोटमध्ये दीपिका पदुकोण पूर्णतः लक्ष्मी अग्रवाल यांच्यासारखी दिसत आहे.
छपाक चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणं नोकझोक असून या गाण्यातील दीपिका आणि विक्रांत मेस्सी यांच्यातील नोकझोक प्रेक्षकांना सध्या चांगलीच पसंत पडली आहे. हे गाणं रिलीज होताच काही क्षणातच या गाण्याला सोशल मीडियावर लाखोंच्या घरात लाईक मिळाले आहे.
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. तर दीपिका पदुकोणही या चित्रपटाची निर्मिती करत आहे. दीपिकासह विक्रांत मेसीही चित्रपटात मुख्य भूमिका निभावत आहे. या चित्रपटात दीपिकाचे नाव मालती असणार आहे.