पुणे – शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत शिवाजीनगर मेट्रो प्रोजेक्टच्या कामासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. दि. 8 जूनपासून हा शिवाजीनगर एसटी स्टॅंड परिसरामध्ये तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.
होणारे पुढीलप्रमाणे बदल
शिवाजीनगर एसटी स्टॅंड आऊट गेटपासून न.ता.वाडी कडे जाण्यास आणि न.ता.वाडीकडून शिवाजीनगर एसटी स्टॅंडकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. या मार्गाऐवजी सिमला ऑफीस चौकातून-वीर चापेकर चौक-के.एम. जोशी पथामर्गे न.ता.वाडीकडे जाता येणार आहे. सिमला ऑफीसकडून न.ता.वाडीकडे जाणाऱ्या पीएमपी बसेससह सर्व वाहनांनी या मार्गाचा वापर करावा.
शिवाजीनगर एसटी स्टॅंड आऊट गेट ते न.ता.वाडी चौकापर्यंत दोन्ही बाजूस नो पार्किंग.
दळवी हॉस्पिटल ते देवी हाईटसपर्यंत दोन्ही बाजूस नो पार्किंग.
देवी हाईटस ते कृषी भवनापर्यंत दोन्ही बाजूस नो पार्किंग.
वीर चापेकर चौक ते न.ता.वाडी रोडवरील दोन्ही बाजूस नो पार्किंग.