‘सरकार बदलणे म्हणजे येडय़ा गबाळ्याच काम नाही.’

मुंबई – पंढरपूर पोट निवडणूकीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूरात सभा घेतली. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन सरकारवर टीका केली.

‘सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा, ते आपण बदलू. पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे,’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर   अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

काय म्हणाले अजित पवार

‘भाजपची  नेतेमंडळी पंढरपुरात येऊन जर सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा, ते आपण बदलू. पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे असं म्हणत असेल तर  मला त्यांना एकच सांगायचं आहे की,सरकार बदलणे म्हणजे येडय़ा गबाळ्याचे काम नाहीच. स्वतःचे आमदार फुटून आमच्याकडे येऊ नयेत म्हणून भाजपकडून सरकार बदलाच्या वावडय़ा उठवल्या जात आहेत, असा  असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिल आहे.’

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.