स्मार्टफोन बदलताय? तर मगं हे वाचाच…

Fiel photo

अवंत कारखानीस  

स्मार्टफोनवर मिळणाऱ्या भरपूर डिस्काऊंटमुळे बहुतांशी मंडळी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करतात. म्हणून आपणही जुना फोन बदलून नवीन फोन वापरणार असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर भविष्यात आपल्याला अडचणी येणार नाहीत.

टू फॅक्‍टर ऑथेंटिकेशन : आपले अकाऊंट सुरक्षित राखण्यासाठी यूजर नेहमी टू फॅक्‍टर ऑथेटिंकेशनचा वापर करतात. मात्र, आपण जर फोन बदलताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे टू फॅक्‍टर ऑथेटिंकेशनसाठी आपल्याला जुन्या फोनवर अवलंबून राहण्याची गरज पडू नये. तसे पाहिले तर दुसऱ्या सिस्टिमवर जीमेल किंवा ऍप लॉग इन करण्यासाठी एक कोड आपल्याला द्यावा लागतो. हा कोड आपल्या मोबाइलवर येतो. जर आपण आपला सिम बदलला असेल तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागेल. अशा स्थितीत मोबाइल बदलण्याअगोदर गूगल अकाऊंटवर जाऊन नवीन नंबरला अपडेट करणे गरजेचे आहे.
चाट हिस्ट्री : फेसबुक, ट्‌विटर, इस्टाग्राम यांसारख्या अनेक ऍप्सवर चॅट हिस्ट्रीच्या बॅकअपची गरज भासत नाही. दुसऱ्या डिव्हाईसकडूनही आपण या ऍपला लॉग इन करून आपली जुनी चॅट हिस्ट्री मिळू शकेल. मात्र, काही ऍप्स असेही असतात की त्याठिकाणी आपल्याला मॅन्युअली मेसेज बॅकअप करावा लागतो. जर आपण व्हॉटस्‌अप वापरत असाल तर फोन बदलण्यापूर्वी आपण चॅट हिस्ट्रीचे बॅकअप निश्‍चितपणे करा.
रजिस्टर डिव्हाईस : अनेक ऍप्स वापरण्यापूर्वी आपल्याला अगोदर साइन इन करावे लागते. यूजर या ऍप्सला साइन इन केल्यानंतर त्याचा वापर करतात आणि त्यानंतर अन इन्स्टॉलदेखील करतात: परंतु आपण अनइन्स्टॉल करण्यापूर्वी आपण साईनआऊट केले होते का, हे पाहणे गरजेचे आहे. कारण spotify आणि google play music सारखे ऍप एकावेळी एकाच डिव्हाईसवर काम करतात. त्यामुळे मोबाइल बदलण्याअगोदर या ऍप्सवर जाऊन साईन आऊट करणे गरजेचे आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)