पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफ जवानांच्या वाहतूक नियमांत बदल – महासंचालक भटनागर

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरच्या पुलवाम येथील सीआरपीफवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यांनतर वाहतूक नियमांत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीआरपीएफचे महासंचालक आर आर भटनागर यांनी एसओपीएस (स्टटॅंर्ड ऑपरटिंग प्रिन्सिपल्स) मध्ये करण्यात येणाऱ्या बदलांची माहिती दिली आहे.

काश्‍मीरमध्ये सीआरपीएफच्या काफिल्यावर स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवंण्याच्या घटनेनंतर त्याच्या येण्याजाण्याच्या, थांबण्याच्या आणि जम्मू-काश्‍मीर पोलीसांसह सुरक्षा दलांच्या समन्वयाबाबत नियमांत बदल करणार असल्याचे आर आर भटनागर यांनी संगितले. सुरक्षा दलांचे ताफे जाणार असलेल्या मार्गावरून नागरिकांच्या वाहनांची वाहतूक बंद करणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षिततेच्या दृष्टीने ते आवश्‍यक असल्याचे स्पष्ट करून यामुळे नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे, त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.