पुणे – महाराष्ट्र व गोवा या राज्यांसाठी “सेट’च्या परीक्षेची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबवली जाते. ही परीक्षा 21 जून 2020 रोजी घेतली जाणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ही तारीख बदलून आता 28 जून 2020 अशी करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे विद्यापीठाने कळविले आहे.