वाहतूक विभागाचा निर्णय : पूर्वीच्या पार्किंगबाबतचे निर्णय रद्द होणार
पुणे – शहरातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे होण्याच्या उद्देशाने कोरेगाव पार्क, खडक आणि हडपसर वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांना नव्या बदलांचे पालन करणे अनिवार्य आहे. नव्याने बदल केलेल्या ठिकाणांवर पूर्वीचे पार्किंगबाबतचे नियम रद्द करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.
कोरेगाव पार्क वाहतूक विभागांतर्गत करण्यात आलेले बदल पुढीलप्रमाणे आहेत.
– कोरेगाव पार्क लेन क्र. 4 येथे पी 1 आणि पी 2 पार्किंग करता येणार आहे.
– पासपोर्ट ऑफिस ते ताडीगुत्ता चौक येथे रोड कॉर्नर, गेट आणि पंक्चर सोडून रस्त्याच्या दक्षिणेस चारचाकी वाहनांना समांतर पार्किंग आणि उत्तरेस दुचाकी वाहनांना पार्किंग करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
– ढोले पाटील रोडवर सिद्धार्थ पथ येथे पी 1 आणि पी 2 पार्किंग करता येणार आहे.
– मंगलदास रोडवर स्त्याच्या दक्षिणेस ब्ल्यू डायमंड चौक ते नेलर रोड दरम्यान चारचाकी वाहनांना समांतर पार्किंग करण्यात येणार आहे.
– नेलर रोड ते मोबाज चौकापर्यंत नो-पार्किंग झोन करण्यात येणार आहे.
– मंगलदास रोडवर रस्त्याच्या उत्तरेस मोबाज चौक ते ठक्कर रोड कॉर्नर दरम्यान चारचाकी वाहनांना समांतर पार्किंग करण्यात येणार आहे.
– मेट्रो हाऊस कॉर्नरवर ते ठक्कर रोड कॉर्नर दरम्यान चारचाकी वाहनांना समांतर पार्किंग करण्यात येणार आहे.
– ठक्कर रोड कॉर्नरवर 10 मीटर दुचाकी पार्किंग करण्यात येणार आहे.
– नेलर रोड कॉर्नर ते ब्ल्यू डायमंड चौकादरम्यान चारचाकी वाहनांना समांतर पार्किंग करण्यात येणार आहे.
– ठक्कर रोडच्या दोन्ही बाजूला नो पार्किंग करण्यात येणार आहे.
– प्रिया सोसायटी गेट ते राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोरुन मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो-पार्किंग झोन करण्यात येणार आहे.
हडपसर वाहतूक विभागांतर्गत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, शनी मंदिर ते तुकाई दर्शन पोलीस चौकीपर्यंत अवजड वाहनांना चोवीस तास बंदी घालण्यात येणार आहे.
खडक वाहतूक विभागांतर्गत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, सिंहगड गॅरेज चौकामध्ये चौकाच्या चारही बाजूला 30 मीटरपर्यंत नो-पार्किंग झोन करण्यात येणार आहे.