पुणे – गुरूनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त गणेश पेठ भागांतील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. दि. 12 रोजी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत या परिसरातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. देवजीबाबा चौक ते हमजेखान चौकाचा मार्ग आज बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.
या ऐवजी देवजीबाबा चौकातून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी देवजीबाबा चौक-फडके हौद -जिजामाता चौक-बुधवार चौक-बेलबाग चौकाकडून उजवीकडे वळून लक्ष्मी रोडने जावे. यासह देवजीबाबा चौकातून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनांनी देवजीबाबा चौक-फडके हौद-जिजामाता चौकामार्गे शिवाजी रोडने इच्छितस्थळी जावे.