श्री शिवजयंती मिरवणुकीनिमित्त शहरात वाहतुकीत बदल

पुणे – श्री शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शहराच्या मध्यभागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.

मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ दुपारी चारच्या सुमारास भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर येथून होणार आहे. भवानी पेठ, संत कबीर चौक, लक्ष्मी रस्ता, नाना पेठ, सोन्यामारुती चौक, फडके हौद चौक, जिजामाता चौक, शनिवारवाडा, शिवाजी रस्ता मार्गाने जाणाऱ्या मिरवणुकीची सांगता शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस प्रशालेच्या आवारातील श्री शिवछत्रपती पुतळा परिसरात होणार आहे. मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यानंतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. जशी जशी मिरवणूक मार्गस्थ होईल. त्यानंतर मागील बाजुचा रस्ता खुला करून देण्यात येईल. मिरणवूक मार्गावर वाहने लावण्यास मनाई केली, असे वाहतूक शाखेचे अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.

हमाल पंचायतीकडून बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास नाना पेठेतील हमाल पंचायत भवन परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. लष्कर भागातील आझम कॅम्पस येथून सकाळी सव्वाआठच्या सुमारास मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीची सांगता लाल महाल चौकात होणार आहे. श्री शिवजयंती महोत्सव समितीकडून शनिवारवाडा परिसरातून सकाळी नऊच्या सुमारास मिरवणूक काढण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.