गणेश विसर्जनाकरिता आज हिंजवडीतील वाहतुकीत बदल

पिंपरी – हिंजवडीतील गणेश मंडळांचे दहाव्या दिवशीच्या गणपतींचे विसर्जन बुधवारी (दि. 11) होणार आहे. यामुळे सायंकाळी चार वाजल्यापासून हिंजवडीतील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी दिली. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग मेझा नाईन हॉटेल चौक ते शिवाजी चौक कस्तुरी चौक ते शिवाजी चौक इडीयन ऑईल चौक ते शिवाजी चौक पर्यायी मार्ग फेज दोन आणि फेज तीनकडून येणारी वाहने टी जंक्‍शन चौक येथे डावीकडे वळून लक्ष्मी चौक, विनोदे वस्ती मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.

फेज दोन, फेज तीन कडून येणारी वाहने फेज एककडे जाणारी वाहने जॉमेट्रीक सर्कल चौक येथे यू-टर्न घेऊन बैंक ऑफ महाराष्ट्र येथून डावीकडे वळून फेज एक सकलकडे जाऊन इच्छित स्थळी जाऊ शकतील. फेज एकडून येणारी वाहने मेझा नाईन हॉटेल चौकातून डावीकडे गळून लक्ष्मी चौक – विनोदे वस्ती या मागनि इच्छित स्थळी जाऊ शकतील. इंडियन ऑईल चौकातून माणगाव, फेज एककडे जाणाऱ्या वाहनांनी इंडियन ऑईल चौकातून उजवीकडे वळून कस्तूरी चौक विनोदे वस्ती, लक्ष्मी चौक, टी-जंक्‍शन येथून डावीकडे वळून जॉमेट्रीक सर्कल येथून यू-टर्न घेऊन बॅंक ऑफ महाराष्ट्र येथून डावीकडे वळून फेज एक सर्कलकडे जाऊन इच्छित स्थळी जाऊ शकतील.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×