‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या शीर्षकात बदल

मुंबई- बॉलीवुड अभिनेत्री कंगना रानौत आणि राजकुमार राव यांच्या चाहत्यांना ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाची प्रतिक्षा होती. पण आता ही प्रतिक्षा थोडी लांबणीवर गेली आहे. कारण प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाला अडथळा निर्माण झाला आहे.

‘इंडियन सायकॅट्रिक सोसायटी’ या मानसशास्त्रज्ञांच्या मंडळाने या चित्रपटाच्या पोस्टर आणि विषयावर आक्षेप घेतला असून आता, चित्रपटाचे नाव बदलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीझरचं देखील प्रदर्शन दोनदा रद्द करावे लागले आहे.

याआधी चित्रपटाचा अंतरंग सांगणाराना थोडासा मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला आहे. दक्षिणेतील आघाडीचे चित्रपट निर्माते प्रकाश कोवेलामुदी हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.