लोणावळा-पुणे लोकलच्या वेळेत बदल

नियोजितपेक्षा वेळेआधी पुण्यात पोहचणार गाडी

पुणे – लोणावळा ते पुणेदरम्यान धावणाऱ्या लोकल रेल्वेच्या वेळेत दि. 1 जुलै ते 20 जुलैपर्यंत बदल करण्यात येणार आहे. ही लोकल लोणावळा येथून 8.20 वाजता सुटणार असून मळवली, कामशेत, कान्हे, वडगाव, तळेगाव, घोरावाडी, बेगडेवाडी स्थानकांवर नियोजित वेळेमध्ये पोहोचणार आहे. देहूरोड ते पुणे स्थानकांदरम्यान लोकल नियोजन वेळेच्या काही मिनिटे पूर्वी धावणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.