सातारा – 45 लोकसभा पोटनिवडणूक-2019 व सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत जुलै व ऑगष्ट 19 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मतदान केंद्राची पडझड झालेली होती त्याची उपविभागयीय अधिकारी व तहसीलदार सातारा यांनी समक्ष पाहणी केली.
या इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणेचे प्रस्ताव सादर करण्यातआले होते. यास भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याची माहिती 262 सातारा विधानसभा मतदार सघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
मतदान केंद्राचा भाग क्रमांक व नाव, जुन्या मतदान केंद्राचे नाव व बदल करण्यात आलेल्या केंद्राचे नाव पुढीलप्रमाणे भाग क्र.16-वहागाव- जि प प्राथ शाळा वहागाव- जि प प्राथमिक शाळा रांजणी खोली क्र 1, भाग क्र.129-महीगाव- जि प प्राथ शाळा महीगाव- जि प प्राथ शाळा महीगाव खोली क्र.1, भाग क्र.145-दरेखुर्द- जि प प्राथ शाळा दरेखुर्द- दरेखुर्द नवीन अंगणवाडी खोली क्र. 1, भाग क्र.173-नागेवाडी- जि प प्राथ शाळा नागेवाडी – जि प प्राथ शाळा नागेवाडी खोली क्र.4 जुन्या इमारतीसमोरिल, भाग क्र.185-चोरगेवाडी- जि प प्राथ शाळा चोरगेवाडी- चोरगेवाडी अंगणवाडी खोली, भाग क्र.388-मोरेवाडी(वरची पवारवाडी)- जि प प्राथ शाळा मोरेवाडी- जि प प्राथ शाळा पवनगाव खोली क्र 2, भाग क्र.411-धनवडेवाडी- जि प प्राथ शाळा धनवडेवाडी- जि प प्राथ शाळा धनवडेवाडी खोली क्र 1 जुन्या इमारतीसमोरिल.