Remdesivir | देशभरातील बदलत्या गरजांनुसार रेमडेसिविर वितरणात बदल

नवी दिल्ली, दि. 17 – प्रत्येक राज्यातील रेमडेसिविरची आवश्‍यकता लक्षात घेऊन आणि त्याची पुरेशी उपलब्धता राखण्यासाठी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिनांक 23 मेपर्यंतचा रेमडेसिविरच्या वितरणात बदल जाहीर केला आहे.

रेमडेसिविरचे एकूण उत्पादन आणि वितरण यात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. औषधनिर्माण विभाग आणि आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्यांना लिहिलेल्या पत्रानुसार, याआधी 21 एप्रिल ते 16 मे या काळासाठी करण्यात आलेल्या रेमडेसिविर वितरणाच्या नियोजनात, राज्यांच्या बदललेल्या गरजांनुसार बदल करण्यात आला आहे.

हे वाटप राज्य सरकारांना करण्यात आले आहे आणि सरकारी तसेच तसेच खासगी रुग्णालयांतून त्याचे योग्य आणि न्याय्य वाटप करण्यासाठी राज्य सरकारांना त्या अनुषंगाने वितरणावर देखरेख ठेवण्यास सांगितले आहे.

विपणन कंपन्यांकडे पुरेशा खरेदीबाबत त्वरित ऑर्डर द्यावी, जर त्यांनी तसे केले नसेल तर ते पुरवठा साखळीनुसार राज्य सरकारांना वाटपातून जितक्‍या प्रमाणात वाटप करावयाचे आहेत, त्यासाठी कंपन्यांच्या संपर्क अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही खरेदी करावयास लागेल. राज्यातील खासगी वितरकांशीदेखील संपर्क साधता येऊ शकेल, असा सल्ला राज्य सरकारांना देण्यात आला आहे,

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.