गरोदर स्त्रियांच्या मेंदूत या काळात होऊ शकतात बदल

गरोदरपणात स्त्रीयांच्या एकंदरितच प्रकृतीत अनेक बदल होताना दिसून येतात. प्रत्येकीच्या तब्येतीप्रमाणे हे बदल होत असतात. तब्येत वेगवेगळी असल्याने हे बदलही वेगवेगळे असतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात गरोदरपणात स्त्रियांच्या मेंदूमध्ये दुरगामी बदल होतात असे समोर आले आहे. खरं तर या काळात होणारे हे बदल बुद्धिमत्तेमध्ये होत असून ते सकारात्मक असतात, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. या बदलांमुळे स्मरणशक्ती आणि मानसिक क्षमतेवर कोणतेही परिणाम होत नाहीत.

गरोदर महिलांना भविष्यात मूल सांभाळताना येणाऱ्या आव्हानांशी सामना करण्यात यावा म्हणून हे बदल घडत असतात. संशोधकांनी पहिल्यांदा गरोदर होणाऱ्या महिलांच्या गरोदरपणाच्या काळात आणि प्रसूतीनंतरच्या काळात मेंदूत होणाऱ्या बदलांचे निरीक्षण केले. तसेच पहिल्यांदा पिता होणाऱ्या पुरुषांच्या व अपत्य नसलेल्या जोडप्यांच्या मेंदूचेही निरीक्षण केले.

त्यामध्ये गरोदर महिलांच्या बुद्धिमत्तेत जेथे फरक पडत असल्याचे समोर आले. यामुळे बाळाला होणारे आजार, भावना तसेच त्याच्या संरक्षणाची गरज समजण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे त्या मातेच्या मानसिक स्वास्थ्यावर कोणताही परिणाम होत नाही. दरम्यान प्रसूतीनंतर दोन वर्षे मातांवर संशोधन करण्यात आले पण हे बदल किती दिवस टिकतील हे त्यामुळे समोर आले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.