पिंपरी, (प्रतिनिधी) – गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १३) सांगवी परिसरातील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे. गैरसोय टाळण्यासाठी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
सांगवी वाहतूक विभाग अंतर्गत शुक्रवारी (दि. 13) दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत पुढील प्रमाणे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून फेमस चौकाकडे जाणारा मार्ग बंद
पर्यायी मार्ग – पाण्याची टाकी जुनी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले ब्रिजमार्गे.
बंद मार्ग – माहेश्वरी चौकाकडून माकण हॉस्पिटल चौक जुनी सांगवीकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग – बँक ऑफ महाराष्ट्र जुनी सांगवी मार्गे औंध किंवा पाण्याची टाकी जुनी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले ब्रिज मार्गे.
बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून साई चौक ते माहेश्वरी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा रा घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.
बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून क्रांती चौक/फेमस चौकाकडे जाणारा मार्ग बंदी.
पर्यायी मार्ग – काटे पूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा रा घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.
बंद मार्ग – कृष्णा चौकाकडून साई चौकाकडे जाणारा मार्ग बंदी.
पर्यायी मार्ग – काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा रा घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.
बंद मार्ग – साई चौक तसेच कृष्णा चौकाकडून जुनी सांगवी पाण्याच्या टाकीकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – बा रा घोलप-ढोरे फार्म-एमके हॉटेल-मयूरनगरी-काटे पूरम चौक मार्गे.
बंद मार्ग – पाण्याची टाकी जुनी सांगवी ते बँक ऑफ महाराष्ट्र चौक तसेच शितोळे पेट्रोल पंपाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग – साई चौकातून पाण्याची टाकी जुनी सांगवी पोलीस चौकीजवळून महात्मा फुले ब्रिज कडून औंध मार्गे.