पुणे – ३५० शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत “हिंदवी” हे शिवकालीन ऐतिहासिक दागिन्यांची श्रेणी असलेल्या कलेक्शनचा उद्घाटन समारंभ चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि. सातारा रोड,पुणे येथील सुवर्णदालनामध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या प्रसंगी चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि. सुवर्णपेढीचे चेअरमन किशोरकुमार शहा, संचालक सिध्दार्थ शहा, संचालक सम्यक शहा व इतर मान्यवर उपस्थित होते.
हिंदवी कलेक्शन सोने आणि चांदी या दोन्ही प्रकारामध्ये सर्वांसाठी खुले करण्यात आलं आहे. यामध्ये सिंहमुखी ब्रेसलेट,रुद्राक्ष बाळी, भिकबाळी, राजमुद्रा अंगठी, शिवमुद्रा अंगठी, राजमुद्रा पेंडंट, शिवमुद्रा पेंडंट या आणि अशा प्रकारचे इतरही दागिने चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि. च्या सर्व स्टोअर्समध्ये उपलब्ध असणार आहेत.
याप्रसंगी बोलताना युवराज संभाजीराजे म्हणाले कि, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच स्थान आपल्या प्रत्येकाच्या मनात आदराचं आहे. अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि त्यागातून महाराजांनी उभ्या केलेल्या जाज्वल्य इतिहासाची भव्यता, दिव्यता आणि विचारांचे संस्कार भावी पिढीला समजावेत, या ऐतिहासिक वारस्याच स्मरण नेहमी राहावं याकरिता चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् या सुवर्णपेढीने हाती घेतलेलं काम निश्चितच कौतुकस्पद आहे.
शिवराज्याभिषेक दिनाचा ३५० वा नेत्रदीपक सोहळा रायगडावर साजरा होत असताना, या सोहळ्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला ३५० सुवर्णहोनांनी अभिषेक करण्यात आला. हे सुवर्ण होन बनविण्याचे पवित्र काम, १९६ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् सुवर्णपेढीकडून घडलं हि खुप सुखावणारी आणि आम्हा सर्वासाठी एक अभिमानाची गोष्टआहे.
अशा भावना चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि या सुवर्णपेढीचे संचालक सिद्धार्थ शहा यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर शिवराज्याभिषेकासाठी वापरण्यात आलेल्या होनांपैकी एक होन चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि च्या सर्व स्टोअर्समध्ये शिवप्रेमींकरिता दर्शनासाठी उपलब्ध केलेले आहेत. तसेच स्वराज्याच्या संपन्नतेचे प्रतीक असणाऱ्या होनाची प्रतिकृती चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स प्रा. लि सुवर्णपेढीने शिवप्रेमींना खरेदीकरिता उपलब्ध दिली आहे असेही त्यांनी सांगितले.