बंगळुरू : चांद्रयान दोन मोहिमेतील लॅंडर विक्रमचा ठावठिकाणा समजला असून त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के शिवन यांनी रविवारी दिली.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर बिक्रम लॅंडरचा शोध घेण्यात यशस्वी झालो आहोत. त्याचे बहुदा हार्ड लॅंडिंग झाले असावे. मात्र त्यात त्याचे काय नुकसान झाले याची माहिती आम्हाला नाही. त्याच्याशी संपर्क सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी दोन आठवडे ते सुरूच ठेवण्यात येतील.
विक्रमचा संपर्क तुटला त्यावेळी तो चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर होता. त्यावेळी त्याचा वेग प्रतिसेकंद 60 मिटर होता, अशी माहितीही त्याषनी दिली.