Chandrashekhar Bawankule । राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चिघळले आहे. या मुद्द्यावरुन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमी टीका करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे समर्थन करत त्यांची पाठराखण केली. देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे मारेकरी नाहीत. तर त्यांनीच सलग 20 दिवस जागून मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा तयार केला होता, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे अडीच वर्षे बरबाद केले Chandrashekhar Bawankule ।
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचा काम केले.
मला आठवतो त्या ठिकाणी मुंबई मेट्रोचे प्रकल्प सर्व झाले मराठवाड्यासारखी वाटरगीचा प्रकल्प वाढला. जलयुक्त शिवार योजना उद्धव ठाकरेंच्या सरकारने बंद पाडल्या. मुख्यमंत्री असताना जे उद्धव ठाकरे मंत्रालयात फक्त दोन दिवस आले अशा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे अडीच वर्षे बरबाद केले” असा आरोप त्यांनी केला.
देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा आणि संपूर्ण टीमने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम झाले. त्यावेळी जे काम झाले, मला आठवते, मी मंत्री होतो. त्या काळात देवेंद्रजींनी 20 रात्री जागून टिकणाऱ्या मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केला. ते पहाटे चार वाजेपर्यंत जागायचे. आम्ही त्यांना म्हणायचो, तब्येतीची काळजी घ्या, असे बावनकुळे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी Chandrashekhar Bawankule ।
आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की, मराठा आरक्षणाचा कायदा तयार झाला, विधिमंडळात मंजूर झाला, हायकोर्टात मंजूर झाला, पण जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कसा कमजोर आहे, आर्थिक दुर्बलता त्याबद्दलचा भाग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारने सुप्रीम कोर्टात मांडला नाही. सुप्रीम कोर्टात केस सुरू होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये केस लढले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.