Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur News) सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. कारण, गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या 13 महिलांच्या समुहावर एका वाघाने हल्ला केला. ज्यामध्ये एकाचवेळी 4 महिलांचा जीव गेला. वनविभागाने केलेल्या तपासात हा हल्ला टी-2 नामक वाघिणीने केल्याचे निष्पन्न झाले होते. राज्यात आजवर वाघाने हल्ला केल्याच्या आणि त्यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र, वाघिणीच्या हल्ल्यात (Chandrapur News) एकाचवेळी 4 महिलांनी जीव गमावण्याची ही पहिलीच घटना असल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे या वाघिणीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर होते. Chandrapur News ज्यानंतर आता 48 तासांच्या आत वनविभागाने 4 महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-2 वाघिणीला (Chandrapur News) जेरबंद केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाने पवनपार बीट कक्ष क्रमांक 282 मध्ये ही कारवाई केली आहे. टी-2 वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश प्राप्त होताच वन विभागाच्या विशेष पथकाने जंगल परिसरात तिचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. या पथकाने शनिवारी (ता. 23 मे) रात्री 7.15 च्या सुमारास ट्रॅन्क्युलायझर डार्टद्वारे एका वाघाचा वेध घेतला. सुरुवातीला अंधारामुळे डार्ट लागलेला वाघ हल्लेखोर वाघीण आहे किंवा नाही याविषयी संभ्रम होता. पण त्यानंतर सदर वाघ ही नरभक्षक टी-2 वाघीण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 8 च्या सुमारास तिला जेरबंद करण्यात आले.