#व्हिडीओ : हातकणंगलेच्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी चंद्रकांत पाटलांची धावाधाव

कोल्हापूर – हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपचे उमेदवार धैर्यशील माने आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क टॅक्टरमधून दाखल झाले. या ट्रॅक्टरच्या फ्रंट सीटवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागरांसह जिल्हाप्रमुख बसले होते. विशेष म्हणजे या ट्रॅक्टरचे सारथ्य शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी केलं तर मागील दोन्ही ट्रॉलीमध्ये १२ बलुतेदार समाजातील लोकांनाच समावेश होता.

लोकसभेची रणधुमाळी ट्रॅक्टरमधून सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे. कालच हातकणंगले मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी बैलगाडीतून शक्तिप्रदर्शन करत हातात बॅट घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आज शिवसेना भाजपा महायुतीचे हातकलंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी बारा बलुतेदार समाजातील नागरिकांसोबत रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ट्रॅक्टर मधून काढण्यात आलेल्या रॅलीला बहुजन विकास रथ असं नाव देण्यात आलं होतं. या ट्रॅक्टरमध्ये फ्रंट सीटवर हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या सोबत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचेसह जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव आणि शिवसेनेचे इतर नेते बसले होते. विशेष म्हणजे या ट्रॅक्टरचे सारथ्य हे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी केले तर याच ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या दोन ट्रॉलीमध्ये बारा बलुतेदार समाजाचे लोक सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आल्यानंतर चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर, कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिनचेकर आमदार सत्येजित कदम, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या प्रमुख उपस्थित उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केला.

भर उन्हात ट्रॅक्टर मधून काढलेल्या रॅली मध्ये 12 बलुतेदार समाजातील लोक अपापल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी हातकणंगले मतदार संघाची निवडणूक आणि प्रचाराची जबाबदारी ही परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर आहे. या दोन्ही नेत्यांनी देखील यावेळी राजू शेट्टी यांच्यावर खरपूस टीका केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.