कोल्हापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर साऱ्यांना नव्या मंत्रिमंडळाचे उत्सुकता लागून राहिले आहे नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळातील स्थान निश्चित मानले जात आहे. पाटील यांच्याकडे मंत्रिपदाची धुरा देऊन प्रदेशाध्यक्ष नव्या चेहऱ्याकडे सोपविण्याचा विचारात भाजप आहे. चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलार किंवा राम शिंदे यांची निवड होऊ शकते.
राऊतांच्या लोटांगण वक्तव्यावर केसरकारांचा हल्लाबोल; म्हणाले, राऊत स्वतःला…
शिंदे व फडणवीस यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या सरकारमध्ये कोणा कोणाचा समावेश करायचा याविषयी भाजपात चर्चा होत आहे.
अन् खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपघातग्रस्त वारकऱ्यांना व्हिडीओ कॉल, म्हणाले…
2014 ते 2019 या कालावधीत भाजप-शिवसेना सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांनी विविध खाती सांभाळली आहेत.बांधकाम, महसूल खाते सांभाळले होते. शिंदे फडणवीस सरकारमध्ये पाटील यांना महत्त्वाचे खाते मिळणार असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे प्रदेशाध्यक्षपदाची मुदत फेब्रुवारीपर्यंत आहे. या पदासाठी आशिष शेलार व राम शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.