चंद्रकांत पाटलांनी स्वीकारला भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी महसूल मंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. दरम्यान आज चंद्रकांत पाटलांनी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीचे राज्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. मी याला पद नाही, जबाबदारी मानतो.

मुख्यमंत्री म्हणाले, चंद्रकांत दादा गेली साडेचार वर्षे अनेक खाती, जबाबदारी, विधानपरिषदेतील काम सक्षमपणे पाहत आहेत. कार्यक्षम मंत्री म्हणून प्रतिमा उभी केली पण त्यांचा मूळ पिंड संघटनात्मक कार्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.