सोलापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खुर्चीचा पाय तुटल्याने त्यांचा तोल गेला. सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आज (12 फेब्रुवारी) चंद्राकांत पाटील यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ही घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सोलापूर येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील हे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. फडणवीस केंद्रीय मंत्रीपदाचा कारभार स्वीकारणार आहेत अशी चर्चा सुरु आहे, यावर उत्तर देत असताना अचानक त्यांच्या खुर्चीचा पाय तुटला. त्यामुळे त्यांचा तोल गेला. यावेळी बाजूला उभे असललेले जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी पाटील यांना आधार दिला. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
अन् चंद्रकांत पाटलांची खुर्ची तुटली
सोलापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खुर्चीचा पाय तुटल्याने त्यांचा तोल गेला. #चंद्रकांतपाटील #म #मराठी pic.twitter.com/sQENwWxzuV
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) February 12, 2020
राज्यात गोंधळलेले सरकार आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. भरदिवसा महिलेला जाळले जात आहे. आधीच्या सरकारमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले होते, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आपणच निवडणूक जिंकलो अशा आविर्भावात शरद पवार आणि त्यांचे पुतणे प्रतिक्रिया देत आहेत. दिल्लीत यांच्या पक्षाला शून्य मतं आहेत. शेजारच्याला मुलगा झाला म्हणून पेढे वाटण्यासारखं काम हे करत आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगाविला.