पुणे – शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून द्यावे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करावी, अशी मागणी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष एयर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदन साठे आणि विश्वस्त श्रीकांत नगरकर यांनी ही मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते. शनिवारवाडा वास्तूचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठानला आश्वासन दिले.
तसेच पाटील यांनीगृहमंत्री अमित शहा आणि पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती पत्र लिहिले असून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही म्हटले आहे.